बाजार समिती विषयी
कृषि उत्पन्न बाजार समिती, लातूर ची स्थापना दि. २४-१०-१९३१ रोजी झाली आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण लातूर तालुका आहे. बाजार समितीची उपबाजारपेठ मुरुड येथे आहे.
संचालक मंडळाच्या कारकिर्दीत बाजार समितीने उल्लेखनीय आर्थिक प्रगती केली आहे.
लातूर बाजारसमिती आवारामध्ये प्रामुख्याने तूर, हरभरा, उडीद, मुग, सोयाबीन, सुर्यफुल, गहू , ज्वारी व गुळ या शेतमालाची मराठवाडा विभाग, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यातून आवक होते.
ई - नाम
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि बाजार योजना ई - नाम या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांमध्ये लातूर बाजार समितीची निवड झालेली आहे
शेतमाल तारण कर्ज योजना
साल २०१६-२०१७ या वर्षासाठी लातूर व उपबाजारपेठ मुरुड येथे दि. ७/११/२०१६ रोजी सोयाबीन शेतमाल तारण कर्ज योजनेचा शुभारंभ झाला. आजपर्यंत २९७ शेतकऱ्यांनी २०,७५१ क्विंटल सोयाबीन ठेवले असून त्यांना रु. ४,०१,५०,७८५/- मात्र कर्ज अदा करण्यात आले आहे.
वॉटर कुलर व R.O.प्लांट
लातूर बाजार समितीच्या वतीने बाजार आवारामध्ये शेतकरी व आवारात काम करणाऱ्या घटकांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी वाटर कुलर व R.O.प्लांट ची व्यवस्था केली आहे.
गोडाऊन
गोडाऊन
नवीन गुळमार्केट येथे ६ गोडाऊन असून त्याची एकूण क्षमता १०००० मी. टन आहे. ४ गोडाऊन हे गुळासाठी व २ गोडाऊन हे शेतमाल तारण योजेनेसाठी उपयोगात आहेत.
शेतकरी भोजनालय
उपहारगृह
बाजारसमिती मध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था म्हणून खास शेतकरी उपहारगृह बांधले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना योग्य दरात उत्तम भोजनाची सोय आहे.
इलेक्ट्रॉनिक वजनकाटा
इलेक्ट्रोनिक वजनकाटा
लातूर बाजार समितीने मार्केट यार्डात रेल्वेनाका येथे एक ४० टन क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व शिवनेरी नाका येथे एक तसेच चौकी नं. ०२ येथे एक, असे दोन ५० टन क्षमतेचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविले आहेत. तसेच उपबाजार मुरुड येथेही एक ४० टन क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविला आहे.
शेतकरी निवास
शेतकरी निवास
कृषि उत्पन्न बाजार समिती , लातूरच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना राहण्यासाठी मुख्य कार्यालयाच्या तळमजल्यावर राहण्याची सोय केली आहे.
वसतीगृह
लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना लातूर शहरात राहून शिक्षण घेणे अवघड होत असल्यामुळे लातूर बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी १५० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधले असून तेथे अल्पशा दरात राहण्याची सोय केली आहे .
सभागृह
लातूर बाजार समितीच्या कार्यालयीन इमारती शेजारी भव्य असे स्व. दगडोजीराव (दादा) देशमुख स्मृती भवन असून त्यामध्ये १ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. सदरील सभागृहामध्ये शेतकरी मेळावे व शेतकरी प्रशिक्षण घेतले जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांना जैविक शेती संदर्भात , माती परीक्षण , बीज प्रक्रिया प्रमाणित बियाणे उत्पादन , पिक नियोजन , विक्री व्यवस्था इत्यादी बाबत माहिती दिली जाते.